सातारा : अपघातात एका चिमुकल्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी कार चालकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास वाढे, ता. सातारा गावच्या हद्दीत रोहित सतीश नलावडे या युवकाने त्याच्या ताब्यातील टाटा कंपनीची हेरिअर कार क्र. एमएच 11 डीझेड 2901 बेदरकारपणे, भरधाव वेगाने चालवून तेथीलच शिवार्थ मनोज नलावडे या चिमुकल्यास जोरदार धक्का दिला. या अपघातात या चिमुकल्याचा मृत्यू झाला असून याबाबतची फिर्याद राजेंद्र गणपत गोरे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.