कृष्णानगर येथील इरिगेशन कॉलनीमध्ये सिंचन विभागातील कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

by Team Satara Today | published on : 14 May 2026


सातारा : कृष्णानगर येथील इरिगेशन कॉलनीमध्ये राहणाऱ्या सिंचन विभागातील कर्मचाऱ्याने गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली असून, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

महादेव लक्ष्मण धनवडे (वय ५१), मूळ रा. श्रमिक कॉलनी, कागल, जि. कोल्हापूर) व सध्या रा. इरिगेशन कॉलनी, कृष्णानगर, सातारा हे सिंचन विभागात प्रथम लिपिक म्हणून कार्यरत होते. त्यांनी राहत्या घरात गळफास घेतल्याने त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालय सातारा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. या प्रकरणाची एमएलसी नोंद करण्यात आली आहे.

ही घटना दि ७ रोजी सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार भोंडवे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात ९ वर्षीय अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; युवकावर पोक्सोचा गुन्हा दाखल
पुढील बातमी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाचे आज (शुक्रवारी) लोकार्पण; शाहू चौकात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम

संबंधित बातम्या