सातारा : महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 17 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास सातारा शहर परिसरात राहणाऱ्या एका महिलेच्या मुलास मारहाण करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी गणेश जनार्दन शेलार (रा. केसरकर पेठ, सातारा) याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार वाघमारे करीत आहेत.