कोरेगाव शहरातील जुन्या एस.टी. स्टँड परिसरात महिलेच्या बॅगेतील सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

by Team Satara Today | published on : 11 September 2026


कोरेगाव : कोरेगाव शहरातील जुन्या एस.टी. स्टँड परिसरात महिलेच्या बॅगेतील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरट्याने लंपास केली. या चोरीत ९६ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला असून याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निर्मला वसंत ढाणे (वय ६५, रा. निनाम पाडळी, सध्या विक्रोळी, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. २८ ऑगस्ट रोजी त्या जुन्या एस.टी. स्टँड परिसरात असताना त्यांच्या बॅगेतील पाकिटांमधून सोन्याचे मंगळसूत्र, अंगठी, झुमके आणि ८५० रुपये रोख चोरीस गेले. चोरीस गेलेल्या दागिन्यांची अंदाजे किंमत ९६ हजार रुपये आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
माण, खटाव, फलटण व कोरेगाव तालुक्यांत पाणी टंचाई भासणार नाही असे नियोजन करा - पालकमंत्री शंभूराज देसाई
पुढील बातमी
पुसेसावळीत कराड रस्त्यालगत असलेल्या भांड्याच्या दुकानात चोरी; ५ लाखांचा मुद्देमाल लंपास

संबंधित बातम्या