सातारा : दुकान बंद करण्यास सांगितल्यानंतर ग्राहक असल्याचे सांगत थांबलेल्या तरुणावर लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना सदरबझार परिसरात घडली. याप्रकरणी सचिन फरांदे याच्याविरुद्ध सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
प्रथमेश संजय चव्हाण यांनी फिर्याद दिली. 14 सप्टेंबर रोजी रात्री के. बी. पी. कॉलेजच्या पाठीमागे हा प्रकार घडला. दुकान बंद करण्यावरून झालेल्या वादात संशयिताने प्रथमेश यांच्या पाठीवर रॉडने वार केला. डोक्यावरील हल्ला रोखताना त्यांच्या कोपराला दुखापत झाली. पायाच्या नडगीवरही मारहाण करण्यात आली. मध्यस्थी करणार्या प्रविण चव्हाण यांनाही मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तपास हवालदार मोरे करीत आहेत.
के. बी. पी. कॉलेजच्या पाठीमागे दुकान बंद करण्यावरून वाद; तरुणावर रॉडने हल्ला
by Team Satara Today | published on : 16 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा