कराड : कराड उत्तर विधानसभा मतदार संघामधील गावांना विकास निधी उपलब्ध झालेला आहे.
यामध्ये कोणेगाव (ता. कराड) येथे रस्ता काँक्रीटीकरणासाठी 10 लाख, कोर्टी येथे सभामंडप बांधण्यासाठी 10 लाख, बाबरमाची येथे सभामंडपसाठी 5 लाख, भगतवाडीत गटर बांधण्यासाठी 10 लाख, मसूर येथे स्मशानभूमी शेड करण्यासाठी 8 लाख, अपशिंगे (मि.) येथे रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी 10 लाख, गुजरवाडी येथे रहिमतपूर-तारगाव रोड ते मारुती मंदिरपर्यंत काँक्रीटीकरण करण्यासाठी 10 लाख, पिंपरी येथे झेंडा चौकात काँक्रीटीकरण करण्यासाठी 10 लाख, बोरगाव येथे रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी 8 लाख, वेणेगाव, ता. सातारा येथे रस्ता काँक्रीटीकरणासाठी 5 लाख, विरवडे येथे सभामंडप बांधण्यासाठी 10 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या कामांमुळे गावातील दळणवळण सुलभ होणार आहे.