महिलेला त्रास देत विनयभंग करून जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या युवकावर अ‍ॅट्रॉसिटीखाली गुन्हा

by Team Satara Today | published on : 29 April 2026


सातारा : सातारा तालुक्यातील एका गावात महिलेचा पाठलाग करून अश्लील कृत्ये व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी सुरज शिवाजी पठारे (वय ३०) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिला नदीवर गेली असताना आरोपीने तिचा पाठलाग करून अश्लील इशारे केले. त्यानंतर घरासमोर येऊन गैरवर्तन व धमक्या दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पोलिसांनी विनयभंगासह संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शाहूपुरी परिसरातील समता पार्कमधून तरुणी गायब तर वस्तीगृहातून विद्यार्थिनी बेपत्ता
पुढील बातमी
कुमठे गावात जमीन वादातून एकावर कोयत्याने हल्ला; शेतकरी जखमी, तिघांविरोधात गुन्हा

संबंधित बातम्या