अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या !

ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांचे निर्देश

by Team Satara Today | published on : 31 May 2025


सातारा : अतिवृष्टीने माण तालुक्यात अनेक गावे बाधित झाली आहेत. यामध्ये शेतांचे, घरांचे, पशुधनाचे तसेच रस्त्यांचे नुकसान झाले आहे. शासनाच्या मदतीपासून बाधित एकही गाव वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. 

माण तालुक्यातील अविृष्टीने बाधित गावांची पाहणी ग्रामविकास मंत्री गोरे यांनी केली. या   पाहणीप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अपर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, प्रांताधिकारी उज्वला गाडे, तहसीलदार विकास अहिर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

ज्या ठिकाणी रस्ते खचले आहेत त्या ठिकाणी तात्काळ रस्त्यांची दुरुस्ती करावी.   वाहून गेलेल्या पुलांच्या ठिकाणी नवीन पुलाचे काम तात्काळ सुरु करण्यात यावेत. अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे त्यांचेही पंचमाने लवकरात लवकर पूर्ण करावेत. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी घरेही पडली आहेत, बाधितांना तात्काळ मदत मिळवून द्यावी, अशा सूचनाही ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गोरे यांनी दिले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हा माहिती कार्यालयातील वाहनचालक विष्णु शिंदे यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार
पुढील बातमी
सातारा हिरवळीत न्हाऊन निघणार !

संबंधित बातम्या