सोन्याची अंगठी चोरी केल्याप्रकरणी दोन महिलांसह एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 17 June 2026


सातारा : सोन्याची अंगठी चोरी केल्याप्रकरणी दोन महिलांसह एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, औक्षणासाठी काढलेली सोन्याची 50 हजार रुपये किंमतीची अंगठी चोरी झाली. ही घटना दि. 14 जून रोजी शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी महिलेने दोन महिलांसह एकाविरुध्द तक्रार दिली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सोशल मिडीयावर पत्नीची आक्षेपार्ह फोटो पोस्ट केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा
पुढील बातमी
गळफास घेऊन सातारा शहरातील अल्पवयीन मुलाची आत्महत्या

संबंधित बातम्या