देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के

वर्षा निवासस्थानी गृहप्रवेश केल्यावर, अक्षय्य तृतीयाच्या शुभमुहूर्तावर फडणवीसांनी दिली गुडन्यूज

by Team Satara Today | published on : 30 April 2025


मुंबई  : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्षय्य तृतीयाच्या शुभ मुहुर्तावर दोन मोठ्या गुडन्यूज दिल्या आहेत. देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांची सुकन्या दिविजा फडणवीस ही दहावी उत्तीर्ण झाली आहे. त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या शुभमुहूर्तावर वर्षा या मुख्यमंत्र्‍यांच्या शासकीय निवासस्थानी गृहप्रवेश केला आहे. अमृता फडणवीस यांनी ट्वीटरवर पोस्ट शेअर करत याबद्दलची गुडन्यूज दिली आहे.

अमृता फडणवीस यांनी काही मिनिटांपूर्वी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लेक दिविजा फडणवीस हिचा दहावीचा निकाल जाहीर झाल्याचे सांगितले आहे. त्यासोबतच फडणवीस कुटुंबाने अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर वर्षा या निवासस्थानी गृहप्रवेश केल्याचेही त्यांनी सांगितले.

“सर्वांना अक्षय तृतीयेनिमित्त हार्दिक शुभेच्छा. आजच्या शुभमुहूर्तावर वर्षा या निवासस्थानी आम्ही छोटीशी पूजा संपन्न करीत गृहप्रवेश केला. आजच्या दिवशीची आणखी एक अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सर्वांना सांगताना मन खुशीने भरून गेलंय, आमची सुकन्या दिविजा ही १०वी च्या बोर्ड परीक्षेत ९२.६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे”, असे अमृता फडणवीसांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

सर्वांना अक्षय तृतीयेनिमित्त हार्दिक शुभेच्छा. आजच्या शुभमुहूर्तावर वर्षा या निवासस्थानी आम्ही छोटीशी पूजा संपन्न करीत गृहप्रवेश केला. आजच्या दिवशीची आणखी एक अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सर्वांना सांगताना मन खुशीने भरून गेलंय, आमची सुकन्या दिविजा ही १०वी च्या बोर्ड परीक्षेत ९२.६०… 

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर कधी राहायला कधी जाणार? असा प्रश्न विरोधकांकडून वारंवार विचारण्यात येत होता. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देताना ते कधी राहायला जाणार याबद्दल सांगितले होते. ‘माझ्या मुलीची दहावीची परीक्षा संपल्यावर वर्षावर रहायला जाणार आहे. एकनाथ शिंदेंनी वर्षा सोडल्यावर मला तिथे जायचं आहे. त्याच्यापूर्वी काही छोटी-मोठी कामं तिथे चालू होती. दरम्यानच्या काळात माझी मुलगी १० व्या वर्गात आहे, तिची परीक्षा सुरु होत आहे. ती म्हणाली परीक्षा झाल्यानंतर तिथे शिफ्ट होऊ. म्हणून मी काही शिफ्ट झालो नाही. परीक्षा झाल्यावर शिफ्ट होईन” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मंदिरे सजली.. ..
पुढील बातमी
मोदी सरकारने जातिनिहाय जनगणना करण्याची केली घोषणा

संबंधित बातम्या