खंडणीसह मारहाण केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 16 January 2025


सातारा : खंडणीसह मारहाण केल्याप्रकरणी चार जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 14 रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास खिंडवाडी, ता. सातारा येथील एबी नावाच्या लॉज मध्ये लॉजचे मालक आशुतोष हिंदुराव माने रा. धनगरवाडी कोडोली सातारा हे त्यांच्या मॅनेजर इरफान बरोबर बसले असताना प्रशांत नानासो मुळीक रा. न्यू विकास नगर सातारा, चेतन रमेश तरटे रा. विकास नगर सातारा, प्रसाद नितीन साखरे रा. सदर बाजार सातारा आणि निखिल उर्फ बिटक्या (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) या चौघांनी तेथे येऊन माने आणि इरफान यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच कॅश काउंटर मधील अंदाजे सहा हजार रुपये काढून घेऊन जिवे मारण्याची धमकी देऊन गेले आहेत. अधिक तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अज्ञात मोटरसायकलच्या धडकेत एकाचा मृत्यू
पुढील बातमी
बार्शीतील वाघाला आणणार सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात

संबंधित बातम्या