रसायनाने भरलेला बॅरलचा स्फोट

1 जण ठार तर एक गंभीर जखमी

कराड : रसायनाने भरलेला बॅरलचा स्फोट होऊन एक कामगार ठार तर एक गंभीर जखमी झाला. तासवडे (ता. कराड ) येथील औद्योगिक वसाहतीत शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. बॅरलच्या स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की, या आवाजाने परिसर हादरून गेला. भिकेश कुमार रंजन (वय २७, मूळ रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. तासवडे औद्योगिक वसाहत) असे ठार झालेल्या कामगाराचे नाव आहे.

तासवडे औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत शुक्रवारी दुपारी वेल्डिंगचे काम सुरू होते. त्यावेळी तेथील कामगार रसायनाने भरलेल्या बॅरलचे झाकण काढण्यासाठी गेले. झाकण काढत असताना अचानक बॅरलचा स्फोट झाला. या स्फोटात भिकेश कुमार रंजन हा ठार झाला, तर अन्य एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मागील बातमी
विश्वविक्रम करणाऱ्या पाच युवकांनी घेतली जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट
पुढील बातमी
सातारा पालिकेचा सोनचिरैया मकर संक्रांत महोत्सव सुरु

संबंधित बातम्या