दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू; तीन जण जखमी

by Team Satara Today | published on : 08 June 2025


सातारा : पुणे-बेंगलोर आशियाई महामार्गावरील सर्व्हिस रोडवर झालेल्या दोन दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू, तर तीन जण जखमी झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 7 रोजी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास किरण सोमनाथ कदम रा. खेड, सातारा आणि त्याचा मित्र प्रथमेश प्रकाश नलावडे रा. वनवासवाडी, सातारा हे दोघे वाढे फाटा ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक जाणार्‍या सर्व्हिस रोडने बुलेट क्र. एमएच 11 बीएस 0079 वरुन जात असताना बॉम्बे रेस्टॉरंट ते वाढे फाटा येत असणार्‍या प्रणय महेश साळेकर रा. आनेवाडी, ता. जावली आणि त्याच्या पाठीमागे बसलेला त्याचा मित्र टीटू मलिक रा. सुआन, बाद्रक, ओरिसा यांच्या दुचाकी क्र. एमएडब्ल्यू 7840 चा अपघात झाला. या अपघातात प्रथमेश नलवडे याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असून अन्य तिघांवर सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक भालेकर करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
संमेलनाचे शिवधनुष्य सातारकर पेलणार
पुढील बातमी
पोक्सो प्रकरणी दोन जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या