सातारा : जागेच्या वादातून हाणामारी केल्यानंतर सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. आरफळ, ता.सातारा येथे ही घटना घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सतिश बाबूराव साबळे (वय 61, रा. आरफळ) यांनी गोविंद साबळे, सागर साबळे, दिपक साबळे यांच्यासह एकूण सहा जणांविरुध्द तक्रार दिली आहे. दुसरी तक्रार गोविंद बाबूराव साबळे (वय 66, रा.आरफळ) यांनी सतिश साबळे, प्रतिक साबळे, अभिजीत भोसले यांच्यासह एकूण सहा जणांविरुध्द दिली आहे. काठीने मारहाण करत दमदाटी, शिवीगाळ केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.