सातारा : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम-२०१३ अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य गट योजनेमध्ये अन्नधान्याचा लाभ घेत असलेल्या लाभार्थीचे शिधापत्रिकेत संलग्न असलेले आधार क्रमांक बरोबर असल्याचे, शिधापत्रिकेत नमूद व्यक्ति त्याच आहेत याची खात्री करुन रास्तभाव दुकानातून 15 एप्रिल पर्यंत ई केवायसी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
सर्व तालुका कार्यालयांना रास्तभाव दुकान स्तरावर कॅम्प आयोजित करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत, तरी ज्या लाभार्थीनी अद्यापही ई केवायसी केलेली नाही, त्यांनी स्वताचे आधार कार्ड व शिधापत्रिका घेऊन जवळच्या रास्तभाव दुकानात जाऊन ई केवायसी करुन घ्यावी, असे न केल्यास भविष्यात शिधापत्रिकेवरील धान्य बंद होण्याची शक्यता आहे.