शाहूनगर मध्ये चैन स्नॅचिंग

सातारा : शाहूनगर मध्ये अज्ञात चोरट्यांनी चैन स्नॅचिंग केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 31 रोजी पावणेचार वाजण्याच्या सुमारास शाहूनगर येथील अजिंक्य बाजार चौकाच्या अलीकडे असलेल्या मोकळ्या मैदानाजवळ कल्पना उमेश शिंदे रा. शाहूनगर, गोडोली, सातारा यांच्या पाठीमागून मोटरसायकल वरून आलेल्या दोन जणांपैकी मागच्या युवकाने त्यांच्या गळ्यातील 80 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र ओढून घेऊन ते पळून गेले आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भालेकर करीत आहेत.


मागील बातमी
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा
पुढील बातमी
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या