शाळेमध्ये हिंदी भाषेची सक्ती नको

राज ठाकरे यांचे पत्र सातारा मनसे अध्यक्षांनी दिले मुख्याध्यापकांना

by Team Satara Today | published on : 19 June 2025


सातारा : हिंदी भाषेची सक्ती कोणत्याही शाळांमध्ये करण्यात येवू नये, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र दिले आहे. हे सातारा शहरातील विविध विद्यालयांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातारा शाखेच्यावतीने शहराध्यक्ष राहुल पवार व पदाधिकाऱ्यांनी दिले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने सातारा शहरातील रयत शिक्षण संस्थेचे महाराजा सयाजीराव विद्यालय, महर्षी कर्वे शिक्षण संस्थेचे कन्या शाळा तसेच आनंद इंग्लिश स्कूल या विविध विद्यालयातील मुख्याध्यापकांना राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या संदर्भात दिलेले पत्र पोहोच करण्यात आले व संबंधित मुख्याध्यापकांना विनंती करून आपण विद्यार्थ्यांवर हिंदीची सक्ती करू नये, अशी विनंती सातारा शहर अध्यक्ष राहुल पवार यांचे कडून करण्यात आली.

यावेळी मनसेचे शहर उपाध्यक्ष भरत रावळ, आजार शेख, मनसे जनधिकार सेना शहराध्यक्ष संदीप दुढले, ओंकार साळुंखे, इमरान शेख, कार्तिक रावळ आदी उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
एनसीसी शिबिरात गुरुकुल स्कूलने मिळवली जिल्ह्यात सर्वात जास्त पारितोषिके
पुढील बातमी
21 जून रोजी संपूर्ण जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करावे

संबंधित बातम्या

सैदापूर, ता. कराड येथील हॉटेलला आग लागून दोन लाखांचे नुकसान कराड : कराड-विटा मार्गानजीक सैदापूर, ता. कराड येथील ओम साई कॉम्प्लेक्समधील चायनीज सेंटरला मंगळवारी (दि. 4) मध्यरात्री आग लागून, सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. याबाबत ज्ञानेश्वर शिवलिंग कुंभार यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सैदापूर येथील जेके पेट्रोल पंपाजवळच्या ओम साई कॉम्प्लेक्समध्ये कुंभार यांचे डीके चायनीज बिर्याणी कॉर्नर हे हॉटेल आहे. कुंभार यांनी मंगळवारी रात्री उशिरा हॉटेल बंद केले. त्यानंतर मध्यरात्री हॉटेलल