01:20pm | Sep 03, 2024 |
पुणे : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका करत आहे. मराठा आरक्षणात अडसर देवेंद्र फडणवीस असल्याचे ते सांगत आहेत. आता त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे सर्वात विश्वासू मंत्री गिरीश महाजन यांना टार्गेट केले आहे. जामनेरमध्ये एक लाख वीस हजार मराठा आहेत. आता बघतोच गिरीश महाजनकडे… इंगाच दाखवतो… या शब्दांत मनोज जरांगेने गिरीश महाजनला आव्हान दिले आहे.
मनोज जरांगे पाटील पुणे जिल्हा दौऱ्यावर आहेत. मंगळवारी बोलताना ते म्हणाले की, निवडणूक लढविण्याबाबत पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांबाबत चर्चा झाली आहे. पण निर्णय कोणताही झाला नाही. पुन्हा एकदा बैठक घेऊ आणि मग ठरवू की निवडणूक लढवायची की २८८ पाडायचे आहेत. आम्ही आमची रणनीती उघड करणार नाही. अन्यथा देवेंद्र फडणवीस डाव करतील, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे लोक मला येऊन गुपचूप भेटतात. ती लोक देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात तक्रार करतात. निवडणूक लढवण्याची वेळ आली तर मी सगळे उघड करेन. दहशतीने निवडणूक जिंकता येत नाही तर मायेने जिंकता येणार आहे, हे देवेंद्र फडणवीस यांनी समजून घ्यावे. देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय सरकारमधील पानही हलत नाही. मुख्यमंत्री कोणीही असो पण निर्णय फडणवीस घेत आहेत.
देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाचा द्वेष करत आहे. त्यामुळे सगे सोयरेचा
निर्णय होत नाही. देवेंद्र फडणवीस आमचा शत्रू नाही, पण मराठा द्वेषामुळे आणि त्यांच्या वागण्याची विचित्र पद्धतीमुळे आम्ही त्यांच्यावर नाराज आहोत. माझ्यावर खोटा खटला दाखल केला. मराठवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोहचावा यासाठी आम्ही नाटक आणले होते. त्यात तोटा आला. आम्ही आमच्या परीने पैसे दिले. जबाबदारी वाटून घेतली. पण माझ्यावर देवेंद्र फडणवीस यांनी खोटा खटला दाखल केला, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा |
कराड परिसरातील 92 गुन्हेगार हद्दपार |
सातारा तालुक्यातून १२ इसम हद्दपार |
तडीपार सराईत दुचाकी चोरटा जेरबंद |
लिंगायत समाज हिंदू धर्माचा अविभाज्य घटक : खासदार अजित गोपछडे |
साहेबराव पवार यांचे विचार मार्गदर्शक : पृथ्वीराज चव्हाण |
शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
राहत्या घरातून एकजण बेपत्ता |
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा |
सणांच्या पार्श्वभूमीवर 14 गुन्हेगार फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून तात्पुरते हद्दपार |
आरोग्य योजनेत गैरप्रकार करणार्या हॉस्पिटलला धडा शिकवणार |
साहेबराव पवार यांचे विचार मार्गदर्शक : पृथ्वीराज चव्हाण |
शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
राहत्या घरातून एकजण बेपत्ता |
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा |
सणांच्या पार्श्वभूमीवर 14 गुन्हेगार फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून तात्पुरते हद्दपार |
आरोग्य योजनेत गैरप्रकार करणार्या हॉस्पिटलला धडा शिकवणार |
गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी |
सावलीत उद्या खेळ पैठणीचा कार्यक्रम |
कष्टकरी-उपेक्षितांच्या चळवळीसाठी डी. व्ही. पाटील यांचे योगदान मोलाचे |
झेडपीसमोर रस्त्यासाठी उपोषण |
शिर्डीत जुनी पेन्शन संघटनेचे १५ रोजी पेन्शन महाअधिवेशन |