भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या राहिलेल्या तीन मोर्चांच्या आणि अठरा आघाड्यांच्या नियुक्ती जाहीर

by Team Satara Today | published on : 04 May 2026


सातारा : भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा सुरेश भोसले यांनी नव्या जिल्हा कार्यकारिणी मधील तीन मोर्चाच्या अध्यक्षांच्या निवडी यापूर्वी  जाहीर केल्या होत्या.  उर्वरित मोर्चांपैकी किसान मोर्चा युवा मोर्चा आणि कामगार मोर्चा यांच्या अध्यक्षाचे निवडी आणि अठरा आघाड्या/ प्रकोष्ट त्यांच्या संयोजकाच्या निवडी आज जाहीर केल्या.

समाजातील सर्व घटकांमधील कार्यकर्त्यांना भारतीय  जनता पार्टीच्या झेंड्याखाली एकत्र करून संघटन वाढवायची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आलेली आहे, नव्या-जुन्या कार्यकर्त्यांचा समतोल राखत जिल्हा कार्यकारिणीमधील तीन मोर्चा  अध्यक्ष आणि अठरा आघाडी संयोजक जाहीर करण्यात आल्याचे  जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सांगितले.

उर्वरित मोर्चे आणि आघाड्या यांच्या अध्यक्षांच्या आणि संयोजकांच्या नेमणुका  सुद्धा लवकरच केल्या जातील अशी माहिती  जिल्हाध्यक्ष डॉ अतुलबाबा भोसले यांनी दिली

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघांना प्रतिनिधित्व देत या मोर्च्यांच्या जिल्हा अध्यक्षपदी आणि आघाड्यांच्या संयोजक पदी योग्य उमेदवारांची निवड करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले नव्या संघटनात्मक रचनेमुळे पक्ष संघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष डॉ. भोसले यांनी व्यक्त केला आणि नियुक्त  पदाधिकाऱ्यांनी समन्वयाने  काम करून पक्ष संघटन वाढवण्याचे आवाहन केले.

या निवडीबद्दल खासदार उदयनराजे भोसले,  नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, नामदार जयकुमार गोरे, आमदार  मनोजदादा घोरपडे, माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार दिलीपराव येळगावकर, माजी आमदार मदनदादा भोसले, माजी आमदार आनंदरावनाना पाटील, माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम, नेते सत्यजितसिंह पाटणकर, किसन मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ, विक्रम पावसकर, भरतनाना पाटील, लोकसभा संयोजक सुनील काटकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रिया शिंदे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजूभैया भोसले यांनी अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्ह्यात बोगस डॉक्टर शोध मोहीम प्रभावीपणे राबवावी - जिल्हाधिकारी संतोष पाटील
पुढील बातमी
मसूरपुर्व भागाला सात तारखेला आरफळ कॅनॉलमधून कण्हेर धरणाचे पाणी मिळणार: आ. मनोज घोरपडे

संबंधित बातम्या