सातारा : सातारा शहर सह तालुक्यातील तीन जणांविरोधात अवैधरीत्या दारू विक्री प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 25 रोजी संध्याकाळच्या सुमारास आकाशवाणी झोपडपट्टी ते महानुभाव मठाकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर दारू विक्री प्रकरणी समीर आबाजी कांबळे रा. कोंडवे, ता. सातारा याच्यावर कारवाई करत त्याच्याकडून 650 रुपये किंमतीच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
दुसऱ्या कारवाईत अंगापूर वंदन, ता. सातारा येथून मारुती रामचंद्र गमरे रा. चिंचणी, पोस्ट कामेरी, ता. सातारा याच्याकडून 960 रुपये किंमतीच्या दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
तिसऱ्या कारवाईत, कण्हेर गावच्या हद्दीतून दत्तात्रय रामचंद्र अगुंडे रा. अगुंडेवाडी, ता. सातारा यांच्याकडून 805 रुपये किंमतीच्या दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.