एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी जेसीबी चालकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 23 September 2026


सातारा : एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी जेसीबी चालकाविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी दिनांक 21 रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास आनेवाडी येथे राहणारी एक विद्यार्थिनी तिच्या चुलत भावाबरोबर दुचाकीवरून येत असताना पुलावर आकाश गणपती कांबळे (रा. हत्तरगा, ता. निलंगा, जि. लातूर) याने त्याच्या ताब्यातील जेसीबी क्र. एमएच 11 बीए 7362 सार्वजनिक रस्त्यावर लोकांच्या जीवितास मालमत्तेस धोका उत्पन्न होईल अशा पद्धतीने पार्किंग लाईट न लावता उभा केला होता. त्यामुळे प्रशांत याला तो दिसला नाही. त्यामुळे झालेल्या अपघातात प्रशांत याचा मृत्यू झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काटकर करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा
पुढील बातमी
मोटारसायकल चोरट्यांचा माग काढत चार गुन्हे उघड; शाहूपुरी पोलिसांची कारवाई; तिघे ताब्यात, ३.८५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

संबंधित बातम्या