कराड बसस्थानकातील तरुणाने काढली तरुणीची छेड

by Team Satara Today | published on : 10 October 2025


कराड : कराड येथील बसस्थानकामध्ये एसटीत चढताना तरुणीची छेड काढण्याचा प्रकार समोर आला. तरूणाने गर्दीचा गैरफायदा घेत एका युवतीची छेड काढली. त्यानंतर तरुणाला संबंधित युवतीनेच चोप दिला. भरगर्दीत युवतीने संबंधित युवकाला पकडून चोप दिल्यानंतर संबंधित युवक तेथून पसार झाला. निर्भया पथकाने त्याचा शोध सुरू केला आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कराड बसस्थानकात विटा बाजूकडे जाणारी एसटी फलाटावर लागली होती. एसटीला गर्दी असल्याने महाविद्यालयीन मुलींसह इतर प्रवाशांनी एसटीत जाण्यासाठी दरवाजासमोर गर्दी केली. एसटीतील प्रवासी बाहेर उतरत असतानाच एसटीत जाण्यासाठी चढाओढ सुरू झाली. त्याचदरम्यान एक युवतीही एसटीत जाण्यासाठी गर्दीत उभी होती. त्या युवतीच्या मागे येत युवकाने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला.

संशयिताने युवतीला वारंवार छेडण्याचा प्रयत्न करताच युवतीने मागे फिरत युवकाला चांगलाच चोप दिला. युवतीचा रूद्रावतार पाहून युवक तेथून पळू लागला. मात्र, तरीही युवतीने धाडसाने त्याचा पाठलाग केला. मात्र, अंधाराचा फायदा घेत युवक तेथून पसार झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या निर्भया पथकाने तेथे पोहचत संशयिताचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अमर रहे, अमर रहे.. जवान सोमनाथ सुर्वे अमर रहे!
पुढील बातमी
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आठवडाभराच्या भारत दौऱ्यावर

संबंधित बातम्या