सदरबाजार येथे हॉटेल मालकास शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 10 March 2026


सातारा : सदरबाजार मारुती मंदिर समोर असलेला हॉटेल राजेंद्र येथे सोन्या उर्फ सुनील आडवे (रा. सदर बाजार सातारा) याने हॉटेल मालक अरुणा मोहनसिंग रजपूत (वय ४५, रा.सदर बाजार सातारा) यांचा मुलगा शिवम यास शिव्या देऊ लागला.

यावेळी फिर्यादी यांनी तू आम्हाला शिव्या का देतो असे विचारले असता संशयित आरोपी सोन्याने फिर्यादीला ढकलून देत त्यांच्या पाठीत बुक्की मारून त्यांना फरफटत नेले. यावेळी फिर्यादीच्या पायाला दुखापत झाली आईला फरफटत नेत असल्याचे पाहून मुलगा शिवम हा सोडविण्यासाठी गेला असता त्याला देखील हाताने आणि लाथा बुक्क्यांनी आरोपीने मारहाण करून शिवीगाळ आणि दमदाटी करत त्याच्या डाव्या हाताच्या दंडाला चावा घेऊन जीवे मारण्याची धमकी दिली याप्रकरणी अरुणा मोहनसिंग रजपूत यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा अधिक तपास गुरव करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे





लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पिलेश्वरीनगर येथे घरगुती वादातून पतीची पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाण; खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा
पुढील बातमी
जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, तसेच एल.पी.जी. घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध - जिल्हाधिकारी संतोष पाटील, घरगुती गॅसच्या अनधिकृत वापराला पायबंद घालण्यासाठी धडक मोहीम

संबंधित बातम्या