सातारा : अपघातात दोनजणांना जखमी केल्याप्रकरणी कारचालकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा-देगाव रोडवर कारची दुचाकीला धडक बसल्याने बाप-लेक जखमी झाले. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अपघातामध्ये बाबजी दिनकर भोसले (वय 42) व श्लोक बाबजी भोसले (वय 9, दोघे रा. चंदनगनर, सातारा) हे दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी रोहिणी बाबजी भोसले (वय 29) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.