अबू आझमी यांच्या प्रतिमेला सातारमध्ये जोडे

मराठा मुस्लिम समाजाचे शिवतीर्थ येथे आंदोलन

by Team Satara Today | published on : 23 June 2025


सातारा : वारकरी संप्रदायाचा समृद्ध वारसा असणार्‍या आषाढी वारीच्या संदर्भात समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्याचा सातार्‍यात निषेध करण्यात आला. मराठा मुस्लिम समाजाच्या सदस्यांनी त्यांच्या प्रतिमेला शिवतीर्थ येथे जोडे मारून निषेध आंदोलन केले.

या आंदोलनामध्ये महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रवक्ते अरबाज शेख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये मराठा मुस्लिम समाजाचे अनेक आंदोलक सहभागी झाले होते. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी आळंदी ते पंढरपूर यादरम्यान जाणार्‍या आषाढी वारीच्या संदर्भात नुकतेच वादग्रस्त वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले. या वक्तव्याचे सातार्‍यामध्ये तीव्र पडसाद उमटले. 

अरबाज शेख यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी मराठा मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये अबू आझमी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. आषाढी वारी ही वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा आहे. या संदर्भात कोणीही अशी वक्तव्ये करून समाजाच्या भावना दुखवू नयेत, असे आवाहन अरबाज शेख यांनी करत घडल्या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारकर धावपटू आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवतील : डॉ.संदीप काटे
पुढील बातमी
फलटण तालुक्यातील फडतरे टोळी दोन वर्षासाठी हद्दपार

संबंधित बातम्या