सातारा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सन 2022 पासून एका अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याप्रकरणी साहिल वामन गंगावणे (रा. आंबवडे खुर्द, मानेवाडी, ता. सातारा) याच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुजावर करीत आहेत.