साताऱ्यात मल्हारपेठ येथे रेशनिंग दुकानातून सोन्याच्या चेनची नातवाकडून चोरी

by Team Satara Today | published on : 01 April 2026


सातारा :  साताऱ्यात मल्हारपेठ येथे एका रेशनिंग दुकानात गेलेल्या ७५ वर्षीय आज्जीच्या गळ्यातील सोन्याची चेन गोड बोलून नातवाने चोरली असल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

याप्रकरणी यशोदा नामदेव इरळे ( वय ५७ रा. मोळाचा ओढा,सातारा) यांनी नातू रोहित आनंदा इरळे (वय २५) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. मल्हारपेठ येथील एका रेशनिंगच्या दुकानात त्या गेल्या असता तेथे त्यांचा नातू आला. त्याने आज्जीशी गोड बोलून गळ्यातील ७५ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन चोरून नेली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार माने करत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
प्रतापसिंहनगर येथे चालत जाणाऱ्यास दुचाकीची धडक; दुचाकी चालकावर गुन्हा
पुढील बातमी
शेंद्रे येथे जुगाराच्या अड्ड्यावर छापा; रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त

संबंधित बातम्या