सातारा : अनावळे येथील साईराज रिसॉर्टमधून चोरट्यांनी शार्दुल विनायक आफळे (वय 34, रा. सोमवार पेठ, सातारा) यांचा एक लाख 65 हजार रुपये किमतीचा कॅमेरा चोरून नेला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शार्दुल आफळे यांचा फोटोग्राफीचा व्यवसाय आहे. ते काही कामानिमित्त अनावळे येथील साईराज रिसॉर्टमध्ये गेले होते. चोरट्यांनी आफळे आणि त्यांचा मित्र विशाल रामदास गुरव (रा. शामगाव, ता. कराड) यांचा कॅनन कंपनीचा कॅमेरा आणि लेन्सची चोरी केली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस नाईक पवार तपास करत आहेत.