सातारा : महिलेला मारहाण केल्याप्रकरणी तीनजणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नागेवाडी, ता. सातारा येथे अंगणात स्वच्छता करणे, बांधकाम करण्यावरुन वाद झाला. यात तिघांकडून महिलेला मारहाण करण्यात आली. हा प्रकार दि. 10 रोजी घडला. सातारा तालुका पोलीस ठाण्यात जयश्री दिलीप सावंत (वय 52, रा. नागेवाडी) यांनी फिर्याद दिली असून, मनिषा जयवंत सावंत, जयवंत किसान सावंत, प्रथमेश जयवंत सावंत (रा. नागेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हवालदार गायकवाड तपास करत आहेत.
महिलेला मारहाण प्रकरणी तीनजणांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 11 January 2025

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या

सातारा शहर चक्री जुगाराच्या जबड्यात
October 22, 2025

ढगाळ वातावरणामुळे बळीराजा धास्तावला
October 21, 2025

जिल्ह्यात साडेसहा हजार हेक्टरवर रब्बी हंगाम पेरणी पूर्ण
October 21, 2025

ऐन दिवाळीत भाजपा पदाधिकाऱ्यावर कोयत्याने वार
October 20, 2025

घाटाई मंदिर परिसरात रानगव्यांचे दर्शन
October 20, 2025