युवतीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 05 June 2025


सातारा : युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राहूल जाधव (रा.पिंपरी, ठाणे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. ही घटना फेब्रुवारी 2023 ते 1 जून 2025 या कालावधीत घडली आहे. संशयिताने युवतीला फोन करुन ‘तू माझ्याशी लग्न कर. तू माझीच आहे. तू माझ्यासोबत लग्न केले नाहीतर तुला कोणाचीच होवू देणार नाही,’ असे म्हणत भाऊ व काकाला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जुगार प्रकरणी एकावर कारवाई
पुढील बातमी
दुचाकीवरुन पडल्याने महिलेचा मृत्यू

संबंधित बातम्या