वैद्यकीय मदत कक्षामुळे गरजू रुग्णांना आधार मिळेल

ना. शिवेंद्रसिंहराजे; ईम्रान मोमीन व सहकाऱ्यांचे केले कौतुक

by Team Satara Today | published on : 08 September 2025


सातारा : माणुसकी जिवंत ठेवण्यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासली गेली पाहिजे. साताऱ्यातील काही युवकांनी सामाजिक बांधिलकी ओळखून रुग्णसेवेसाठी माझ्या नावाने वैद्यकीय मदत कक्ष सुरु केले आहे. याचा फायदा गरजू रुग्णांना होणार असून हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे, असे उद्गार सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले.    

जुना मोटार स्टॅन्ड येथे साईअमृत हॉस्पिटल जवळ कलर्स फाउंडेशनच्या ईम्रान मोमीन व त्यांच्या सहकाऱयांनी 'ना. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले वैद्यकीय मदत कक्ष' सुरु केले असून त्याच्या उदघाटनप्रसंगी ना. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी ईम्रान मोमीन, इरफान शेख, आरिफ शेख, मोहम्मद मुलाणी, आसिफ मुलाणी, ऋषिकेश गंगावणे, मनीष काशीद, सादिक अंबेकरी, हाजी नदाफ, प्रथमेश देवकर, असद बागवान, कुमार अवघडे, अक्षय कुलकर्णी, अख्तर शेख, निलेश कुलकर्णी, नईम शेख, इम्रान शेख, नदीम शेख, इर्शाद बागवान, मुबीन शेख, अम्मार शेख, हुजेफ शेख, सुलेमान भाई आदी उपस्थित होते. 

या वैद्यकीय कक्षामार्फत सर्व प्रकारच्या औषधांवर सवलत, सर्व प्रकारच्या आजरावर तज्ञ डॉक्टर्सचा सल्ला तसेच कमी खर्चामध्ये औषधोपचार, विविध तपासण्यांवर सवलत, बी.पी., शुगर च्या रुग्णांसाठी दर महिन्याची औषधें अल्पदरात घरपोच, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदत, अपंग रुग्णांसाठी सर्जिकल इक्विपमेंट्स सवलतीच्या दरात, ऑक्सिजन मशीन, सक्शन मशीन, बेड सवलतीच्या दरात, गरजू रुग्णांना मोफत औषध पुरवठा यासह रुग्णांचे समुपदेशन व समस्यांचे मोफत निराकरण आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.  



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मराठा बांधवांकडून शशिकांत शिंदेंचा गौरव
पुढील बातमी
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सातारच्या क्रांतिकारकांचे योगदान महत्वाचे : विजय मांडके

संबंधित बातम्या