सातारा : सीएलएमसी म्हणजे संपुर्ण स्तनपान प्रबंधन केंद्र, ह्युमन मिल्क बँक हे नवजात अर्भकांसाठी एक जिवनदायी पाऊल आहे. नवजात बाळांना, ज्यांच्या मातांना दुध देणे शक्य होत नाही त्यांना येाग्य पोषण देण्यासाठी रुग्णालयाने हा नाविण्यपुर्ण उपक्रम राबवला आहे. ही सेवा विशेषत: अतिदुर्बळ व अकाली जन्मलेल्या बाळांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या मिल्क बँकेव्दारे मातांनी देणगी दिलेले दूध वैद्यकीय दृष्टिकोनातून तपासून, प्रकिया करुन गरजु अर्भकांना दिले जाईल. यामुळे नवजात मृत्युदर कमी होईल व बाळांच्या आरोग्याची गुणवत्ता सुधारेल.
या उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ वाई यांनी आर्थिक व तांत्रिक सहाय्य दिले असुन त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. हा उपक्रम सातारा जिल्हयातील आरोग्य क्षेत्रात एक महत्वाचा नवा मैलाचा दगड ठरणार असुन भविष्यात इतर जिल्हयांसाठीही प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. प्रकल्प प्रमुख स्वाती हेरकळ यांनी या प्रकल्पाचा उपयोग सातारा जिल्हयातीन प्रत्येक गरजु बालकाला करुन दिला जाणार असल्याचे सांगितले. द रोटरी फाउंडेशानच्या मदतीने नवजात शिशु अतिदक्षता विभाग आणि रोटरी अमृतधारा ह्यूमन मिल्क बँक या सुमारे ९० लाख रुपयांच्या दोन योजना जिल्हा रुग्णालयात राबविण्यात येत आहेत. प्रत्येक नवजात बालक जगले पाहिजे यासाठी रोटरी प्रयत्नशील आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन आणि जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. युवराज करपे यांनी यासंदर्भात विशेष लक्ष घालुन पाठपुरावा केला. या वेळी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. युवराज करपे, डॉ. महेश खलिपे, डॉ. राहुल देव खाडे, उपस्थित होते.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
