दुर्मिळ फुलांच्या प्रजातीने कास पठार बहरले

by Team Satara Today | published on : 21 August 2024


सातारा : सातारा जिल्ह्यातील कास पठाराला निसर्गाने भरभरुन दान दिले आहे. निसर्गाचा हा चमत्कार पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक कास पठारावर येत असतात. या ठिकाणी दुर्मिळ फुलांच्या प्रजाती फुलण्यास सुरुवात झाली आहे. जैवविविधतेचा हॉटस्पॉट असलेल्या या ठिकाणी पर्यटकांची पावले वळू लागली आहे. 

जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठारावर यंदा दुर्मिळ फुलांच्या प्रजाती फुलण्यास सुरुवात झाली आहे. अजून हंगाम सुरू झाला नसला तरी काही दुर्मिळ फुलांच्या प्रजाती सध्या कास पठारावर पाहायला मिळत आहेत.

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कास पठारावर फुलांचा चांगला बहर पाहायला मिळू शकतो. कास येथील कुमोदिनी तलाव पावसाने भरला आहे. तर सभोवतीचे पूर्ण पठार हिरव्यागार झाडा वेलींनी बहरुन गेले आहे. 

गेंद, भुई, कारवी, चवर, वायुतुरा, पंद पिंडा कोकंणांसीस, विघ्नहर्ता अशी रंगीबेरंगी फुले सध्या तुरळक स्वरूपात कास पठारावर पाहायला मिळत आहेत. येत्या काही दिवसांत सर्वत्र फुलेच फुले दिसणार आहे. विविधरंगी फुले डोलणार आहे. 

पठारावर २८० फुलांच्या प्रजाती आहेत. तसेच वनस्पती वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून ८५० प्रजाती आढळतात. २०१२ साली युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत कास पठाराचा समावेश केला गेला आहे. 

दसऱ्याच्या दिवशी कास पठारावर विविधरंगी खेकडे फिरताना दिसतात. या पठारावर विजनवासात असताना पांडव आले होते, असे सांगितले जाते. त्यांच्या पायाचे ठसे या ठिकाणी दिसतात. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कामाच्या ठिकाणी एकाच जागी बसल्यानं हातापायाला मुंग्या येतात?
पुढील बातमी
शरद पवारांच्या संपर्कात दोन बडे नेते

संबंधित बातम्या