सातारा : बनघर येथील भैरवनाथाची वार्षिक यात्रा शनिवार दि. २६ व रविवार दि. २७ रोजी साजरी होत आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
शनिवार दि. २६ रोजी सकाळी ८ वाजता काठी पूजन कार्यक्रम, दुपारी ५ वाजता भैरवनाथ पालखी मिरवणूक, रात्री ९ वाजता भजन, रात्री १० वाजता महिला मंडळ लेझीम पथक, रात्री १०.३० वाजता छबिना, रात्री ११ वाजता बायना शारदा सातारकर आर्केस्ट्रा होणार आहे. रविवार दि. २७ रोजी सकाळपासून दर्शन सोहळा, सकाळी ११ वाजता बायना शारदा सातारकर लोकनाट्य तमाशा होणार आहे. तसेच सोमवार दि. २८ रोजी सकाळी ११ वाजता शेतकरी कॅम्प व रक्तदान शिबीर, दुपारी ३ वाजता कीर्तनकार हभप सागर महाराज पवार यांचे कीर्तन व रात्री ७ नंतर महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत. तरी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थ मंडळ बनघर यांनी केले आहे.