सातारा : हिमोफिलिया या रक्ताच्या अनुवंशिक आजारावरील उपचार सातारा जिल्हा रुग्णालयातील या आजाराच्या रुग्णांना मिळेनासे झाले आहे. या आजाराचे जिल्ह्यात साडेचारशे रुग्ण आहेत. या आजाराच्या वरील अँटी हिमोफिलिक घटक असणारे फॅक्टर आठ-नऊ ही औषधे उपलब्ध नसल्याने त्यांचे उपचारही थंडावले आहेत.
याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांनी या फॅक्टरची खरेदी करण्याचा प्रस्ताव देण्यात आला असून ही औषधे येत्या काही दिवसातच उपलब्ध होतील, अशी ग्वाही दिली आहे.
हिमोफिलिया हा एक अनुवंशिक आजार असून त्यात जखम झाल्यावर रक्त वाहने थांबत नाही. या आजारावरील उपचारांमध्ये रक्तात जो अँटी- हिमोफिलिक घटक कमी होतो. त्याची इंजेक्शन रुग्णाला दिले जाते. हे इंजेक्शन फॅक्टर 8 व फॅक्टर 9 या नावाने ओळखले जाते. हे इंजेक्शन अतिशय महाग असून या इंजेक्शनला दहा हजार रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो. एखाद्या रुग्णाला अधिक मार लागला असल्यास त्याला ठराविक कालावधीसाठी एकाहून अधिक वेळा इंजेक्शन घ्यावी लागतात. अशी औषधे हिमोफिलिया सोसायटीच्या माध्यमातूनच उपलब्ध केली जातात. सातारा जिल्ह्यात या सोसायटीकडे 450 पन्नास रुग्णांची नोंदणी आहे. पूर्वी हे उपचार मोफत मिळत नसत. तेव्हा सोसायटीतर्फे रुग्णांना इंजेक्शन उपलब्ध करून दिली जात. एखाद्या रुग्णाकडे पैसे नसतील तरी त्याला सोसायटीच्या माध्यमातून इंजेक्शन उपलब्ध होत असत.
सातारा, नाशिक, मुंबई, कोल्हापूर येथे पूर्वी हिमोफिलिया च्या मोफत उपचारांची सोय होती. मात्र सातार्यात गेल्या काही महिन्यापासून या औषधांचा तीव्र तुटवडा आहे. याबाबत औषध निर्माण करणार्या उत्पादक कंपन्यांकडून या औषधांची टंचाई असल्याचे सांगण्यात आले. या उत्पादक कंपन्यांचे विविध पर्याय उपलब्ध झाल्याने आता जिल्ह्यातील रुग्णांना ही औषधी उपलब्ध होतील, अशी ग्वाही जिल्हा शल्य चिकित्सक युवराज करपे यांनी दिली आहे. जिल्हा रुग्णालयात हिमोफिलिया साठी सध्या वेगळा विभाग उपलब्ध नाही. मात्र त्यासाठी वेगळी स्वतंत्र व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.