पैशांच्या व्यवहारातून साताऱ्यातील स्क्रॅप व्यावसायिकाला धमकी देणाऱ्या दोघांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 31 October 2026


सातारा : पैशांच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या वादानंतर स्क्रॅप व्यावसायिकाला मोबाईलवरून शिवीगाळ करीत धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संगमनगर येथील दोघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओबेद सलीम कच्छी (वय 37, व्यवसाय स्क्रॅप मर्चंट, रा. बुधवार पेठ, सातारा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. 29 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास नवीन एमआयडीसी, कोडोली येथे पैशांच्या व्यवहारावरून वाद झाला होता. या वादानंतर विक्रम वाघमारे पैलवान आणि विजय वाघमारे ऊर्फ भैय्या (दोघेही रा. संगमनगर, सातारा) यांनी मोबाईलवरून संपर्क साधला. फोनवरून शिवीगाळ करीत दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या तक्रारीनंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक मोरे पुढील तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अतितमध्ये महामार्गावरील सिमेंट ब्लॉक ठरला जीवघेणा; 20 वर्षीय इचलकरंजीच्या दुचाकीस्वाराचा मृत्यू

संबंधित बातम्या