सातारा : पोलीस असल्याची बतावणी करून एकाची सुमारे सव्वा लाखांची अज्ञातांनी फसवणूक केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 रोजी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास दिलीप रामचंद्र इंगवले रा. पाटखळ ता. सातारा यांना जुन्या आरटीओ चौक रस्त्यावर दोन अज्ञातांनी पोलीस असल्याची बतावणी करून इंगवले यांच्या गळ्यातील चैन, दोन अंगठ्या असा सुमारे एक लाख 28 हजार रुपयांचा, 32 ग्रॅम वजनाचा मुद्देमाल फसवून चोरून नेला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार माने करीत आहेत.
पोलीस असल्याची बतावणी करून सुमारे सव्वा लाखांची फसवणूक
by Team Satara Today | published on : 28 January 2025