सातारा : राधिका रोड भोसले मळा येथील तुकाराम हाइट्स अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी केलेली २५ हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची ड्रीम युगा मोटरसायकल क्रमांक (एम. एच ११ सी.एन ३३३५) ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. ३१ जानेवारी रोजी रात्री दहा ते साडेदहा वाजण्याच्या दरम्यान दुचाकीची चोरी करण्यात आली असल्याची फिर्याद रामदास लक्ष्मण माने (वय ३५ रा. तुकाराम हाइट्स राधिका रोड भोसले मळा सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार इष्टे करत आहेत.
साताऱ्यात राधिका रोडवर भोसले मळा येथून दुचाकीची चोरी
by Team Satara Today | published on : 04 February 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा