‘फुले’ चित्रपट जसा आहे तसा प्रदर्शित करा

प्रकाश आंबेडकरांचा सेन्सॉर बोर्डाला इशारा

by Team Satara Today | published on : 11 April 2025


मुंबई : प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘फुले’ चित्रपटातील काही दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित हा चित्रपट वादात सापडला आहे. सेन्सॉर बोर्डाच्या या निर्णयावर सर्वच स्तरातून तिव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनीही संताप व्यक्त केला असून चित्रपटाला लावलेली कात्री काढली नाही तर सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालयासमोर आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

महात्मा फुले यांच्या कार्याबाबत असलेल्या चित्रपटातील काही सीन काढण्याचे आदेश दिले आहेत. महात्मा फुले यांचे वाड्मय प्रकाशित करण्यात आले आहेत. शासनाशी आम्ही सहमत नाही. वाड्मयाचा दिल्लीतून युक्तिवाद केला जात आहे. महाराष्ट्र सरकारने विचार स्वीकारला असेल तर सेन्सॉर बोर्डाला कुठला अधिकार आला.सेन्सॉर बोर्डचा निषेध आम्ही करतो. सेन्सॉर बोर्ड चित्रपटात असणारे सीन समग्र वाड्मयातील आहेत. त्यामुळे सेन्सॉर बोर्ड ने लावलेली कात्री काढली नाही तर सेन्सॉर बोर्डाच्या ऑफिसवर आंदोलन करू. मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की एका बाजूला अभिवादन करता आणि दुसऱ्या बाजूला चित्रपटाला विरोध करत असाल तर विरोधाभास नको. चित्रपट जसा आहे तसा दाखवला पाहिजे, नाहीतर सेन्सर बोर्डाच्या कार्यालयावर धावा घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
डॉ.आंबेडकर जयंतीदिनी सोशल मीडिया जपून वापरा
पुढील बातमी
चेहऱ्यावरील टॅनिंग दूर करण्यासाठी उन्हाळ्यात वापरा ‘हे’ फुल

संबंधित बातम्या