सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एप्रिल 2024 ते 4 जून 2025 दरम्यान नेहा प्रवीण कोरे राहणार गोडोली सातारा या विवाहितेला अपमानास्पद वागणूक देऊन मारहाण केल्याप्रकरणी पती प्रवीण राव सो कोरे आणि सासू पुष्पा कोरे रा. विजयनगर पुनावळे यांच्या विरोधात सातार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक बोराटे करीत आहेत.