भुईंज : बोपेगाव, ता. वाई येथील ६० वर्षे महिलेचा धोम डाव्या कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बोपेगाव ता. वाई येथील रहिवासी असलेल्या शशिकला आत्माराम भोसले, वय ६० वर्ष या शनिवार, दि. ६ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पांडे, बोपेगाव या दोन गावांच्या मध्यभागातून धोम डावा कालवा जातो. याच कालव्याच्या काठावर त्या गेल्यानंतर त्यावेळी पाय घसरून तोल गेल्याने त्या कालव्यात पडल्या. त्यातच त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
त्यांचा मृतदेह पाण्याच्या प्रवाहात वाहत जाऊन तो भुईंज गावच्या हद्दीत असणाऱ्या भिरडाचीवाडी गावाजवळ दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अडकून राहिल्याने ही घटना उघडकीस आली. या घटनेची नोंद भुईज पोलीस ठाण्यात झाली असून त्याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.