इराण आणि इस्रायल यांच्या युद्ध सुरु झाले आहे. खरे तर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात हमासच्या अतिरेक्यांनी इस्रायलमध्ये अचानक हल्ला करुन झोपलेल्या राक्षसाला जागे गेल्यासारखी त्याची गत झाली आहे. कारण इस्रायलने वर्षभरात हमास विरोधात तसेच गाझापट्टी, लेबनॉन अशा देशात हल्ले करुन 45 हजाराहून अधिक नागरिकांचा नरसंहार केला आहे. मध्य पूर्वेतील या युद्धा दरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन आणि इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेस्कियन यांची भेट होणार आहे. ही भेट तुर्कमेनिस्थान येथे होणार आहे.
इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षादरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची भूमिका मोठी राहीली आहे. इराणने इस्रायलवर रॉकेट हल्ला करण्यापूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांचा ग्रीन सिग्नल घेतला होता असे म्हटले जात आहे. त्यात आता पुन्हा युद्ध सुरु असताना पुतीन आणि इराणच्या राष्ट्रपती मसूद पेजेस्कियन यांची भेट होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुतीन यांचे परराष्ट्र व्यवहार सहयोगी युरी उशाकोव्ह यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की तुर्कमेन कविच्या स्मृतीप्रित्यर्थ समारंभ आयोजित केला जात आहे. या सोहळ्याला दोन्ही देशाचे नेते उपस्थित राहणार आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे.सध्या युद्धजन्य परिस्थितीत दोघांची भेट महत्वाची मानली जात आहे. या बैठकीत द्विपक्षीय मुद्दे आणि मध्य पूर्वेतील बिघडलेल्या परिस्थितीवर चर्चा होणार असल्याचे म्हटले जात आहे. दुसरीकडे पुतीन यांची इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांची नजीकच्या काळात भेट होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे म्हटले जात आहे.
मध्य पूर्वेतील युद्धावर व्लादीमीर पुतीन यांची नजर आहे. जेव्हा युक्रेन सोबत युद्ध झाले तेव्हा अमेरिकेसह अनेक युरोपीय देशांनी रशियावर टीका केली होती. या बैठकीनंतर अमेरिकेचे कट्ट्रर विरोधी असलेले पुतीन उघडपणे इराणच्या बाजू घेऊ शकतात असे म्हटले जात आहे. रशियाची इराण सोबत मैत्रीचे संबंध आहेत. तसेच इराणला ड्रोन आणि मिसाईलचा पुरवठा केल्याचा आरोप रशियावर पाश्चात्य जगत नेहमी करत असते.
इस्रायलला दुहेरी फटका
इस्रायलला गेल्या काही महिन्यात विविध आघाड्यांवर संघर्ष करावा लागत आहे. हेजबोला आणि हमास यांनी सोमवारी संयुक्तपणे इस्रायलवर हल्ला केला होता. मिसाईल डागल्याने दहा लोक जखमी झाले होते. अनेक वाहने आणि इमारती यात उद्धवस्थ झाल्या आहेत. हा हल्ला इस्रायलवर हमास केलेल्या हल्ल्यास एक वर्षे झाल्यानिमित्ताने करण्यात आला होता. हमासने या हल्ल्यातून हे दाखविले की तो अजूनही इस्रायल विरुध लढू शकत आहे. हेजबोलाने दावा केला की मध्यम पल्ल्याच्या फादी-1 मिसाईलने हायफाच्या दक्षिण भागात इस्रायली सैन्य तळावर हा हल्ला केला गेला. या दरम्यान मिडिया रिपोर्टमध्ये म्हटले की हायफावर दोन मिसाईल डागले केले तर 65 किमी दूर असलेल्या तिबरियास शहरावर पाच रॉकेट डागले गेले.
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी |
पाण्याच्या मोटरची चोरी |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी |
पाण्याच्या मोटरची चोरी |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चोरी |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
पुसेगाव येथे सुमारे सव्वा सात लाखांची घरफोडी |
गोडोली येथील भैरवनाथ मंदिर कलशारोहण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळात सोमवारी व्याख्यान |