एका महिलेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा

by Team Satara Today | published on : 27 October 2026


सातारा : एका महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 जून रोजी सातारा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका विवाहितेला भावनिक करून तसेच त्यांचा विश्वास संपादन करून त्यांचे चार लाख वीस हजार रुपये किंमतीचे, 32 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण घेऊन त्याचा अपहार, याचबरोबर त्यांना दमदाटी केल्याप्रकरणी एका महिलेसह तुषार संजय शेडगे (रा. वळसे, ता. सातारा, मूळ रा. अंगापूर, ता. सातारा) यांच्या विरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार म्हेत्रे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वृद्धाला डिजिटल अरेस्टची भीती दाखवून 32 लाख 60 हजारांची फसवणूक; चार जणांवर गुन्हा
पुढील बातमी
काशीळमध्ये एकास मारहाण प्रकरणी तीन एकावर गुन्हा

संबंधित बातम्या