य.मो. कृष्‍णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी सहकार आणि संस्थापक पॅनेलना चिन्हांचे वाटप; २१ जून रोजी मतदान, २३ जून रोजी मतमोजणी

by Team Satara Today | published on : 11 June 2026


कराड : य.मो. कृष्‍णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी बुधवारी चिन्ह वाटप करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली चिन्ह वाटपाची कार्यवाही पार पडली. चिन्ह वाटपात सत्ताधारी सहकार पॅनेलला कपबशी तर विरोधी संस्थापक पॅनेलला नारळ चिन्ह मिळाले आहे. दोन अपक्षांना प्रत्येकी टॅक्ट्रर व शिट्टी असे चिन्ह मिळाले आहे. कारखाना निवडणुकीत सहकार आणि संस्थापक पॅनेलमध्ये दुरंगी सामना पहायला मिळणार आहे. मतदान २१ जून रोजी होणार असून २३ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

य.मो. कृष्‍णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी १३९ उमेदवारी अर्ज होते. त्यापैकी छाननीनंतर १२२ अर्ज उरले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मंगळवारी अंतिम दिवशी उरलेल्या ९६ पैकी ५३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले होते. त्यामुळे निवडणूक रिंगणात ४४ उमेदवार राहिले आहेत. बुधवारी निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा यादव यांनी दोन्ही पॅनेल व दोन अपक्षांना चिन्हांचे वाटप केले. उमेदवारांची चिन्हांकीत अंतिम यादी गुरूवारी जाहीर करण्यात येणार असल्याने अपर्णा यादव यांनी सांगितले.

दरम्यान विद्यमान सहकार पॅनेलला कपबशी चिन्ह देण्यात आले आहे. तर संस्थापक पॅनेलला नारळ चिन्ह देण्यात आले आहे. दोन अपक्षांपैकी गट क्र.1 वडगाव हवेली -दुशेरे मधील अपक्ष उमेदवार विश्वास पांडुरंग जाधव यांना टॅक्टर चिन्ह मिळाले आहे. तर गट क्र. 4 बोरगाव रेठरे -हरणाक्ष गटातील अपक्ष उमेदवार महेश राजाराम पवार यांना शिट्टी चिन्ह देण्यात आले आहे. दरम्यान आता कारखाना निवडणुकीतील प्रचाराला वेग येणार आहे. चिन्ह घेऊन उमेदवार सभासद मतदारांपर्यंत पोहचतील. प्रचार सभा, कोपरा सभा व जाहिरातींचा मारा केला जाईल.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
लक्ष्मी टेकडी येथे जुगार अड्ड्यावर छापा; रोख रक्कम जप्त
पुढील बातमी
भांडेवाडी खूनप्रकरणी तिघा संशयितांच्या मुसक्या आवळल्या; स्थानिक गुन्हे शाखा आणि पुसेगाव पोलिसांची कारवाई

संबंधित बातम्या