03:58pm | Sep 13, 2024 |
सातारा : सातारा शाहुनगर येथील गुरूकुल स्कूल या इंग्रजी माध्यम शाळेच्या विदयार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा नेहमीच विविध उपक्रम राबवित असते. जिल्यातील गुरूकूल स्कूल ही नामांकित शाळा आहे. गुरूकुल शाळेचा 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' या उपक्रमात कोल्हापूर विभागात तिसरा क्रमांक आला आहे. गुरूकुल स्कूल ही नेहमीच विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या हितासाठी शिक्षणाबरोबर खेळ, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमाबरोबर सुरक्षिततेसाठी काळजी घेणारी स्कूल म्हणून प्रचलित आहे.
गुरूकुल स्कूलच्या विद्यार्थ्यांना दररोज स्कूलमध्ये आणने आणि स्कूल सुटल्यावर घरी सोडण्यासाठी २८ स्कूल बसचा वापर करण्यात येतो. या बसचे सर्व चालक हे निर्व्यसनी असून अत्यंत प्रामाणिकपणे गेली १५ वर्षे सेवा देत आहेत. विद्यार्थ्यांना ने आण करणे व त्याचबरोबर त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी हे रिक्षावाले काका फार सतर्क असतात. गुरुकुल स्कुलने सर्व बसेसला GPS प्रणाली (Global Positioning System) कार्यान्वित करून सातारा जिल्हयात प्रथमच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आदर्श घालून दिला आहे.
या GPS प्रणालीचे उद्घाटन सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कु. याशनी नागराजन यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी सौ. शबनम मुजावर, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सातारा रविंद्र खंदारे, सातारा शहर वाहतुक विभागाचे पोलीस निरीक्षक अभिजीत यादव, गुरूकुल संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, कु. ऐश्वर्या चोरगे, माध्यामिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. शीला वेल्हाळ, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. अनुराधा कदम, माध्यमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका सौ. सोनाली तांबोळी, जनसंपर्क अधिकारी विश्वनाथ फरांदे व पालक शिक्षक सदस्य उपस्थित होते.
विद्यार्थी शाळेत स्कूल बसमधून येताना व जाताना त्याची स्कूल बस कोठे आहे, स्कूल बसचा वेग किती आहे, किती वाजता विद्यार्थी घरी पाहोचू शकतो किंवा वेळ का लागत आहे हे सर्व पालकांच्या मोबाईलवर या GPS प्रणालीमुळे दिसणार आहे. यामुळे स्कूल बसमधून प्रवास करणा-या आपल्या मुलांच्या सुरक्षिततेबाबतची काळजी कमी होण्यास मदत होणार आहे. गुरूकुल स्कूलच्या उपक्रमाचे पालकांनी आभार मानले आहेत समाजातून सुध्दा याबाबत कौतुक होत आहे.
यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी कु. याशनी नागराजन म्हणाल्या की, गुरूकुल स्कूल विदयार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विदयाथ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी कार्यरत असल्याचे शाळेचे विविध नाविण्यपुर्ण उपक्रम पाहीले असता दिसून येते. शाळेने पुढाकार घेवून सर्व स्कूल बसमध्ये विदयार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कार्यान्वित केलेल्या GPS प्रणालीमुळे विदयार्थ्यांच्या सुरक्षिततेत नक्कीच याचा फायदा होईल, कोणतीही वाईट घटना घडल्यावर त्रास करून घेण्यापेक्षा सदर घटना घडूच नये म्हणून गुरूकुल शाळा प्रशासन सतर्क असल्याचे शाळेच्या विविध उपक्रमातून दिसत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
गुरूकुल स्कूलमध्ये विदयार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मागील १२ वर्षापासून CCTV संपुर्ण शाळेत आणि परिसरात कार्यान्वित केलेले आहेत. शाळेच्या मुख्य प्रवेशव्दारावर सुरक्षारक्षक सुविधा उपलब्ध केलेली असून शाळा भरतेवेळी व शाळा सुटल्यानंतर विदयार्थी घरी जात असताना शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शाळेच्या परिसरात फिरून बारकाईने लक्ष ठेवत असतात तसेच स्कूलच्या परिसरात निर्भया पथकाचे बोर्ड लावले असून त्यावर आपत्कालीन फोननंबर सुध्दा लिहीले आहेत.
यावेळी आनंद गुरव, मधुकर जाधव, नितीन माने, संजय कदम, उदय गुजर, दिपक मेथा, जगदिश खंडेलवाल, राजेंद्र खंडेलवाल, हरिदास साळुंखे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षक पालक संघ सदस्य उपस्थित होते.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू |
जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे वेतन आयोगासाठी आंदोलन |
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन |
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |