बुधवार नाका येथे जुन्या वादाच्या कारणातून मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी

by Team Satara Today | published on : 25 October 2026


सातारा : मारहाण प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी दिनांक 24 रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास बुधवार नाका येथे जुन्या वादाच्या कारणातून शाहरुख दिया भोसले (रा. जिहे, ता. सातारा) याला लोखंडी रॉड व दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी सुन्या काळे, विष्णू सुन्या काळे, रोहित राष्ट्र भोसले, रवी राष्ट्र भोसले (सर्व रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक बोराटे करीत आहेत.
दुसऱ्या तक्रारीत, सुनील काळे त्यांची पत्नी व मुलगा रोहन यांना मारहाण केल्याप्रकरणी शाहरुख डिया भोसले, सुरज बन्या भोसले, लंकेश ज्योतीराम भोसले, डाय सुन्या भोसले (सर्व रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार कदम करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
युवतीचा विनयभंग प्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा

संबंधित बातम्या