सातारा : शाहूपुरी परिसरात मोकळ्या मैदानाजवळ मनोज कुमार (वय ३०, सध्या रा. करंजे, सातारा, मूळ रा. छत्तीसगड) यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना दि. १३ डिसेंबर रोजी उघडकीस आली. मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबतची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज कुमार हा कामानिमित्त साताऱ्यात वास्तव्यास होता. स्थानिक नागरिकांना मैदानाजवळ एक व्यक्ती हालचाल न करता पडलेली दिसल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाची पाहणी करून पुढील तपासासाठी सिव्हिल रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.
या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे. घातपात की आजारपण, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही.