सातारा : संपूर्ण जगामध्ये सनातन अशा हिंदू धर्मासारखा मूळ असा कोणताही सौहार्दपूर्ण धर्म दिसत नाही जो धर्म कुणावरही उन्माद अथवा अन्याय करत नाही, अगदी प्राणीमात्रांमध्येही जो देवाला पाहतो, असा हा धर्म खरोखरच विश्ववंदनीय असा संस्कारक्षम आणि परंपरेची महती सांगणारा आहे. बाकीचे जे आहेत त्या जाती-जमाती आणि संप्रदाय आहेत. त्यामध्ये भरपूर त्रुटी आढळतात. अथवा त्यांच्याकडून धर्माचे पालनही होत नाही. आज आपल्याला मनुष्य देहाच्या रूपातून मिळालेले जीवन हे चांगले संस्कारक्षम बनवत आपले नित्य कर्म हे अनेक संत, महंत, वेदशास्त्रोक्त आचार्यांच्या, ब्रह्मवृंदांच्या आशीर्वादातून घडवत आपण आपले जीवन उज्वल करा, असा आशीर्वाद द्वारका पिठाचे शंकराचार्य परमपूज्य सदानंद सरस्वती स्वामी महाराजांनी सज्जनगड येथे दिला.
सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या अमृत महोत्सवी सोहळा व विष्णू पंचायतन यागाच्या उपक्रमात सोमवारी सकाळी शंकराचार्य सदानंद सरस्वती स्वामी महाराजांचे बहुमोल मार्गदर्शन झाले.
सोमवारी सकाळी द्वारका पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य परमपूज्य सदानंद सरस्वती स्वामी महाराजांचे पादुकांचे पूजन समर्थ सेवा मंडळाचे वतीने ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत वेदांत गाडगीळ यांनी केले. षोडशोपचार पूजा व पाद्यपूजन सोहळा झाल्यानंतर वेदमूर्ती निरंजनानंद अर्थात धनंजय शास्त्री वैद्य यांनी शंकराचार्यांच्या कार्याची ओळख उपस्थित करून दिली. यावेळी तामिळनाडूतील वेदमूर्ती वंशी कृष्ण यांनी उपस्थित त्यांना अमृत महोत्सव सोहळा व या वेदपरंपरेच्या बाबत अतिशय सुरेखपणे मार्गदर्शन केले. अविनाशी कधीही न संपणारे असे हे वेदांचे वाङ्मय अशा कार्यक्रमातून व सर्वांचे अरिष्ट विघ्न दूर करण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन हे खरोखरच औचित्यपूर्ण असल्याचे सांगितले.
आशीर्वचन सादर होताना श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष परमपूज्य गुरुनाथ महाराज कोटणीस कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी आदी मान्यवरांच्या उपस्थित यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना परमपूज्य शंकराचार्य सदानंद सरस्वती महाराज म्हणाले की यावेळी त्यांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना ,धर्मशास्त्रानुसार कोणताच पक्षपात केला जात नाही. धर्माचा उपदेश हे धर्म आचार्य करतात व तो आदेश राजाला केला जातो. धर्मसंचालन व्यवस्थित केले तर, प्रजासूखी होईल. दुःखाचे मूळ कारण हे वारंवार जन्मप्राप्ती आहे, तर सुखाचे मूळ कारण हे धर्मपालन करणे हेच आहे. जोपर्यंत मी कोण आहे? माझे कर्तव्य काय आहे? व मला काय ध्येयप्राप्ती करायची आहे? यासाठी मन शुद्धी करून धर्माचरण पार पाडावे लागेल. आपल्या धर्मामध्ये पती-पत्नीलाही मार्गावर चालण्यासाठी परंपरेची कास जोडली आहे. एखादा यज्ञ किंवा पूजाविधी करतानाही पती-पत्नी सोबत हे धर्मकार्य होऊ शकते. त्यात कोणताही पक्षपात केला जात नाही. वेद आणि शास्त्रांची संस्कृती जपणारा आपला हा हिंदू धर्म अतिशय पुरातन व परंपरेला साजेसा आहे. ज्यात वेदशास्त्र स्मृती पुराणे यांचा आदर केला जातो. माता-पिता, गुरुला वंदन केले जाते गोमातेलाही साक्षात देवता समजले जाते. आणि जो धर्म पुनर्जन्मात विश्वास ठेवतो असा हा हिंदू धर्म सर्वात श्रेष्ठ आहे. हे लक्षात ठेवावे. इष्ट कर्म, पूर्त कर्म आणि दत्त कर्म अशी विविध कर्म असताना आपण सत्कर्म आणि सत्संग करायला मिळाला तर स्वतःला खरोखरच मोलाचे समजावे सनातन धर्मामध्ये सत्कर्म आणि सत्संग करून सन्मार्गावर चालल्यास सर्वप्राप्ती तुम्हाला होईल, आणि तुमचे जाणे हे मोक्षापर्यंत होईल याचे साधन वेदांतून सांगितले जाते. अशा या वेदपरंपरेला आपण तितकेच जपले पाहिजे.
या महोत्सवात रविवारी सायंकाळी सायंकाळी भजन संध्या कार्यक्रमात माणिक नगर येथील श्री आनंदराज प्रभू व त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय सुरेखांशी माणिक प्रभू यांनी रचलेली विविध देवदेवतांवरील भजने सादर करून उपस्थित त्यांना मंत्रमुग्ध केले. आनंदराज प्रभू व सहकारी यांनी या कार्यक्रमात गुरु महाराज गुरु.. या पदांनी सुरुवात करत त्यानंतर.. देई मजला इतके श्री गुरुराया.. हे माणिक प्रभूंचे भजन अतिशय सुरेख अळवले. नंतर रामदास स्वामींच्या ,,रामदास माऊली जयजय ,,सादर करत ,,रामाची या दूता , अंजनीच्या सुता ही पवनपुत्र हनुमानाची स्तुती सादर करून आजरावर असे. दत्ता ब्रह्मचारी रे, दत्ता ब्रह्मचारी ..हे माणिक प्रभूंचे भजन सादर केले. त्यानंतर भज्य मना तू वायूनंदना.. या पदानंतर बालाजी व्यंकटेश आणि रामदास स्वामींच्या रचना सादर करून हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतदार केला.
रात्रीच्या भजन आणि गायन सेवा कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका कु.आर्या आंबेकर यांनी ..विघ्नहर्ता गणरायाची.. जासू कृपाळू दयाळू.. ही रचना सादर करून आपल्या कार्यक्रमांमध्ये श्री रामचंद्र कृपालु भजन मन.. अतिशय सुरेखपणे आळवले. राम कमल नयन वाले राम ..अशी पदे सादर करत रात्री उशिरापर्यंत सर्व उपस्थित समर्थ भक्तांना एक वेगळ्याच मैफिलीचा आनंद दिला. सोमवारी दुपारी पुणे येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार चारुदत्त बुवा आफळे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले यावेळी कीर्तनातून सुखदुःखाची अतिशय सुरेख सांगड जीवनात कशी घालावी याचे मार्मिक उदाहरणे देत केलेले निरूपण उपस्थित यांना अतिशय भावले.
मंगळवार दि.19 नोव्हेंबर 2024 रोजी या महासोहळ्याची सांगता सकाळी सात ते दहा या वेळेत श्री विष्णू पंचायतन यागाचे उत्तरांग, बलिदान, स्नान, याग पूर्णाहूती, ब्रह्मवृंदास दक्षिणा प्रदान करून यजमानास आशीर्वाद व यागाची सांगता होणार आहे .त्यानंतर सकाळी दहा ते साडेदहा या वेळेत उपस्थित भाविक साधकांद्वारे ब्रह्मवृंदांचे पूजन होऊन सकाळी 11 ते साडेबारा या वेळेत परम श्रद्धेय मंदाकिनीताई गंधे यांचे समारोपपर प्रवचन होऊन समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी यांच्याद्वारे सोहळ्याचे आभार प्रदर्शन कार्यक्रम होऊन कल्याणकारी रामराया या प्रार्थनेने या सोहळ्याची सांगता होणार आहे या सर्व सोहळ्यास समस्त समर्थ भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद घ्यावा असे आवाहन समर्थ सेवा मंडळाचे वतीने करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये चुरशीने 69 टक्के मतदान |
याच साठी केला होता अट्टाहास! |
जिल्ह्यात मतदानासाठी येणार्या चाकरमान्यांची वाहतूक कोंडी |
पूर्णाहूतीने सज्जनगडावर विष्णू पंचायतन यागाची सांगता |
शिर्डीहून साईंच्या पालखीचे येत्या २९ नोव्हेंबरला प्रस्थान |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |
'उमेद'ने केले पावणे दोन लाख कुटुंबांचे समुपदेशन |
आचार संहितेचा भंग केल्यास कडक कारवाई : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
महायुतीचे नेते विश्वासात घेत नसल्याची रयत क्रांती संघटनेची तक्रार |
कराड दक्षिणमधील जनता फालतू माणसाला संधी देत नाही : माजी आ. रामहरी रूपनवर |
मतदार जागृती प्रश्नमंजुषा स्पर्धा कोरेगाव येथे उत्साहात! |