12:36pm | Dec 20, 2024 |
सातारा : विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होऊन त्यांच्या भविष्यकालीन वाटचालीस योग्य दिशा मिळावी यासाठी शिक्षण विभाग जिल्हा परिषद व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने 1 व 2 जानेवारी 2025 या कालवधीत यशोदा टेक्नीकल कॅम्प, सातारा येथे करिअर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याचा पालकांसह विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले आहे.
सातारा जिल्ह्यातील इयत्ता नववी ते इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना ताणतणाव, परीक्षा, व्यवसाय, नोकरी यासंबंधी तज्ञ मार्गदर्शकांद्वारे मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात येणार आहे. तसेच दहावी व बारावीनंतरच्या करिअरच्या संधी, महाकरिअर पोर्टल, कला-वाणिज्य विज्ञान या क्षेत्रातील नोकरी व व्यवसायाच्या संधी, शासनाच्या विविध योजना, उद्योजकीय व्यक्तिमत्व व मार्केटिंग या विषयावर सखोल मार्गदर्शन व चर्चा सत्राचेही आयोजन करण्यात येणार आहे. इयत्ता १२ वी उत्तीर्ण झालेल्या व १८ वर्षे पूर्ण केलेल्या गरजू व कौशल्य प्राप्त उमेदवारांना करिअरचे विविध स्रोत आणि नोकरीच्या संधी देखील या मेळाव्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या मेळाव्यामध्ये संगणक व तंत्रज्ञानात्मक विविध अभ्यासक्रम व त्यावर आधारित प्रत्यक्ष निरीक्षण करण्याची व माहिती मिळवण्याची संधी मिळणार आहे. तरी शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी 1 व 2 जानेवारी दरम्यान आयोजित केलेल्या करिअर मेळाव्यात सहभागी व्हावे, असेही आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले आहे.
शाहूनगर येथे सुमारे लाखाची घरफोडी |
अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर पोक्सो दाखल |
कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांची होणार जगप्रसिद्ध कंदी पेढ्याने तुला |
आदित्यची तळमावले, साईकडेत मिरवणूक |
कराडात सोळा लाखांची ऑनलाईन फसवणूक |
कोरेगांव तालुक्यात कुणबी-मराठा आढळलेल्या नोंदीची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध |
गव्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू |
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
कोरेगांव तालुक्यात कुणबी-मराठा आढळलेल्या नोंदीची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध |
गव्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू |
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी |