सातारा : खोकडवाडी येथील अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जयवंत मारुती चव्हाण (रा. फडतरवाडी, पोस्ट जिहे, ता. सातारा) यांचा खोकडवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत दुचाकी अपघात झाला होता. त्यामुळे त्यांना उपचारासाठी सातारा डायग्नोस्टिक सेंटर येथे आणले असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गुरव करीत आहेत.
खोकडवाडी येथील अपघातात एकाचा मृत्यू; सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद
by Team Satara Today | published on : 21 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा